माजी नगराध्यक्ष सातभाईंसह सात जणांवर गुन्हा दाखल

0

गुन्हा अन्वेषणच्या धाडीत आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शहरात बेकायदेशीर दारु विक्री व वहातूक होत असल्याची नगर येथील गुन्हा अन्वेषण खात्यास कुणकुण लागल्याने आंबेडकर पुतळ्याजवळ शिवाजी रोडवर माजी नगराध्यक्ष संजय सातभाईं यांच्यासह सात जणांना बेकायदेशीर दारु विक्री व वहातूक करतांना रंगे हात पकडले. पोलीसांनी या छाप्यात तिन वाहने, दारु असा साडेआठ लाखाचा ऐवज जप्त केला आहे. सदर घटना घडल्यानंतर संजय सातभाई फरार झाले आहेत. अन्य आरोपींना पोलीसांनी ताब्यांत घेतले आहे.
या संबंधी माहिती अशी की, गुन्हा अन्वेषण खात्यांस गुप्त बातमीदाराकडून आंबेडकर पुतळा शिवाजीरोड येथून पांढरे रंगाची बोलेरो जीप नं. एम.एच.15डी.सी.6566, एम.एच. 14 डी.जे.9001, एम.एच.15 ए.एच.7009 या वाहनातून बेकायदेशीर दारुच्या विक्री करिता वहातूक करुन घेवून जाणार असल्याची खबर लागल्यावरुन पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. मन्सुर सय्यद, योगेश गोसावी, पो.ना. दत्तात्रय गव्हाणे, पो.कॉ. रविंद्र कर्डीले व अन्य पोलीस कर्मचार्‍यांसह गुरुवारी रात्री 10 वाजण्याचे सुमारांस छापा टाकला असतां वरील ठिकाणी आरोपी बबन जयवंत रणधिर, संजय रामचंद्र चव्हाण हे दोघे रा. रांजणगांव देशमुख, संजय सातभाईं कोपरगाव

 

 

तर दुसर्‍या वाहनात बबन मोगल येवले रा. हरेगांव, संजय सातभाईं कोपरगाव व तिसर्‍या वाहनात जालिंदर गोरक्षनाथ चितोळकर, विकास कैलास खंडीझोड दोघे रा. वेस व संजय सातभाईं कोपरगाव यांना अनुक्रमे रुपये 3 लाख 44 हजार 480, रुपये 1 लाख 55 हजार 412, रुपये 3 लाख 12 हजार 480 एकूण रुपये 8 लाख 12 हजार 372 चा ऐवज रंगेहात पकडला. या ऐवजामध्ये वरील तिन वाहने व या वाहनांमध्ये भिंगरी दारु, देशी विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या, मोबाईल मिळून आले आहे.

 

 

स्थानिक पोलीसांच्या मदतीने अहमदनगर येथील गुन्हे अन्वेशन खात्याने टाकलेल्या या धाडीने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीसांनी संजय सातभाई यांना फरार घोषित केले आहे.

LEAVE A REPLY

*