Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

माजी आमदार रशीद अब्दुल यांचे श्रीनगरमध्ये आंदोलन  

Share

श्रीनगर | वृत्तसंस्था

जमात-ए-इस्लामी या संस्थेवर बंदी, स्थानिक प्रशासन व राज्यपाल यांच्याकडून न मिळवणाऱ्या सुविधेंच्या विरोधात अवामी इत्तेहाद पक्ष (एआयपी) प्रमुख आणि माजी आमदार अब्दुल रशीद यांनी श्रीनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षातील शिक्षा भोगत असलेल्या कार्यकर्त्यांना सोडविण्याचीही मागणी केली. आंदोलकांनी सचिवालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुरक्षा रक्षकांनी तो हाणून पाडला.

सचिवालयापासून सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना ५०० मीटरवर अडवले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार अब्दुल रशीद यांनी केला आहे.

काश्मिरी जनता गुन्हेगार नाहीत. काश्मिरी जनता राजकीय कैदी आहेत. तसेच आवामी इत्तेहादच्या नेत्यांना अटक केली म्हणून सरकारवर अब्दुल रशीद यांनी टीका केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!