माजी आयएएस अधिकारी दुर्गाप्रसाद यांच्या पार्थिवावर शिर्डीत अंत्यसंस्कार

0
शिर्डी (प्रतिनिधी) – 1998 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी दुर्गाप्रसाद रेड्डी यांचे कॅन्सरच्या आजाराने मंगळवारी टाटा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. साईबाबांचे निस्सीम भक्त असलेले दुर्गाप्रसाद यांनी साईबाबांच्या सांनिध्यात शिर्डीत अंत्यसंस्कार करण्यात, यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार पत्नी व मुलांनी त्यांचे पार्थिव शिर्डीत आणून त्यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केले.
त्यांनी अनंतपूरम हैदराबाद येथे जिल्हाधिकारी असताना गोरगरिबांसाठी प्रभावी योजना राबविल्या होत्या. याबाबत आय. ए. एस. अधिकारी दुर्गाप्रसाद यांची मुलगी डॉ. साईश्रेयशा यांनी सांगितले, की 1986 साली वडील दुर्गाप्रसाद पहिल्यांदा शिर्डीत आले. त्यावेळी त्यांनी साईचरित्र ग्रंथाचे पारायण केले. तेव्हापासून ते बाबांचे भक्त होते. बाबांनी दिलेल्या श्रध्दा व सबुरीचा संदेश त्यांनी अंगीकारला.
अनंतपूरम, हैदराबाद येथे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या. गोरगरिबांच्या सेवेतच साईंची सेवा ते मानत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासले. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मंगळवारी त्यांनी हॉस्पिटलमध्येच शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा साईबाबांच्या सांनिध्यात शिर्डी येथे अत्यंविधी करण्यात आला.
दुर्गाप्रसाद रेड्डी यांच्या पश्‍चात पत्नी डॉ. जयलक्ष्मी रेड्डी, मुलगी डॉ. साईश्रेयशा रेड्डी, मुलगा कल्याण चक्रवर्ती असा परिवार आहे. महाराष्ट्राचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीनारायण व शिर्डी पोलिसांनी अत्यंसंस्कार प्रसंगी सहकार्य केले.

 दुर्गाप्रसाद रेड्डी यांनी आपला अत्यंविधी शिर्डीतच व्हावा, अशी इच्छा मित्र तथा महाराष्ट्राचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे व्यक्त केली. लक्ष्मीनारायण यांनी शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना याबाबत सूचना केल्या. इंगळे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांकडून अंत्यविधीसाठी रीतसर परवानगी घेतली. परवानगीचे पत्र उपायुक्त लक्ष्मीनारायण यांच्या व्हॉट्सपवर टाकले. त्यांनी ते दुर्गाप्रसाद यांना दाखविले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी 7 वाजता टाटा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. बुधवारी सकाळी दुर्गाप्रसाद यांचे पार्थिव शिर्डीत आणण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यापूर्वी साईबाबांच्या समाधीवरील पुष्पगुच्छ त्यांच्या पार्थिवावर अर्पण करण्यात आले. त्यानंतर मुलगा कल्याण चक्रवर्ती याने अग्निडाग दिला.

LEAVE A REPLY

*