Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न; बाबुर्डी बेंद येथे घडला प्रकार

Share

पोलीसांनी घेतले एकास ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणार्‍या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचार्‍यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.याबाबत समजलेली माहिती अशी की, जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत.

तसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती. मतदान यंत्राजवळ मतदानासाठी गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनातून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले.याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!