Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : राजकारणात काहीही होऊ शकते…शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या युतीवर भूजबळांचे सूचक वक्तव्य

Share

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात राष्ट्रवादीकडे कल अधिक दिसत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या स्थितीत असून कॉंग्रेस त्यापाठोपाठ असल्याचे  भुजबळ म्हणाले.

भाजप स्वबळावर येईल असं सांगत होत मात्र तसे होतांना दिसत नाही.  भाजपचा आत्मविश्वास जो होता तो दिसत नाही.  काँग्रेस राष्ट्रवादी परफॉर्मन्स चांगला आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं चांगलं कमबॅक केलं आहे. ६ जागेवर राष्ट्रवादी, काँग्रेस २ निवडून येतील. अजूनही हे उमेदवार आघाडीवर आहेत.  भाजपच्या काही जागा आम्ही जिंकू असेही भुजबळ म्हणाले.

बीजेपी सेना जे बोलत होते तसं होतांना दिसत नाही. काँग्रेसनं कमी जोर लावून ४० दाखवताय अजून जोर लावला असता तर १० ते १५ जागा आल्या असत्या असे वाटते.

साताऱ्यात देखील आघाडीने चांगलं काम केलं आहे. नांदगाव मध्ये आत्ता जरी राष्ट्रवादीची जागा मागे असली तरी अजून काही फेऱ्या बाकी आहेत त्या ठिकाणी पंकज पुढे येतीलच.

लोकांच्या पाठीमागे असल्यानं जनतेनं आशीर्वाद दिला आहे. नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी लोक पुढे आले आहेत.  सचिन अहिर तिकडे गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांची लढत कमी झाली होती.

ईव्हीम बाबत शंका आहे, माझ्या मतदार संघातही तसं घडलंय. पूर्ण निकाल लागल्यावर सगळं कळेल. पवार साहेबांच्या सभेमुळं वातावरण फिरलं होते.

राष्ट्रवादीला ७० ते ७१ आणि काँग्रेसने ६० पर्यंत जागा येतील अशी अपेक्षा होती. काँग्रेसनं अजून प्रचारात आघाडी घेतली असती तर अजून फायदा झाला असता.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सेना सत्तास्थापण करण्यासाठी एकत्र होऊ शकते का यावर भुजबळ म्हणाले राजकारणात काहीही होऊ शकते. यामुळे नव्या आघाडीच्या चर्चांना उधान आले असून शिवसेनेकडून मात्र यावर कुठलीही चर्चा कानावर पडलेली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!