प्रत्येकाने स्वत:मधील क्षमता ओळखणे गरजेचे- सुभाष चंद्रा

0
सातपूर । समाजात कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना युवकांची ओढाताण होत आहे. मुलांमध्ये स्वत: निर्णय घेण्याची क्षमता विकसीत होणे गरजेचे आहे. प्रत्येकात खूप क्षमता आहेत मात्र प्रत्येकाने स्वत:ला मर्यादा घातलेल्या आहेत त्यामुळे स्वत:च्या गूणवत्ता ओळखूच शकलेले नाहीत. प्रत्येकाने स्वत:ला ओळखणे आज महत्वाचे असल्याचे प्रतिपादन खा.सुभाष चंद्रा यांनी केले.

येथील स्वामिनारायण मंदीर सभागृहात आयोजित चर्चासत्रात सुभाषचंद्रा बोलत होते. यावेळी नाशिक वनबंधू परिषद व अग्रवाल समाजाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अग्रवाल सभा अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, कार्याध्यक्ष सूरेश गुप्ता, वनबंधू परिषदेचे अध्यक्ष सुनिल चांडक, उपाध्यक्ष प्रकाश लढ्ढा, अनिल मेहता, संरक्षक अशोक तापडीया हे होते.

यावेळी बोलताना खा. चंद्रा यांनी समाजात देर्‍याचाआनंद गेण्याची भावना जागवण्याची गरज असल्याचे सांगितले. शासकिय प्रणालीतील सिस्टम चांगली आहे. लोकही चांगले आहेत. त्यांच्या सूधारणा होताना दिसून येत आहे. काळानूरुप त्यात बदल होण्याची चिन्हे दिसून येत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

यावेळी धुळे येथील युवकांने केलेल्या अथक परिश्रमातून उभ्या राहीलेल्या डीजीटल शाळांबद्दल त्यांनी अनूभव कथन केले. त्या माध्यमातून उपस्थितां संवाद साधत सुभाष चंद्र यांनी त्यांच्या कार्याची माहीती जाणून घेतली.

त्यासोबतच डॉ. श्री कांत पूर्णपात्रे यांच्या अविरत कार्याची नोंद गेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करुन देण्यात आली. यावेळी डॉ. पूर्णपात्रे यांनी आपल्यातच आव्हाने लपलेली आहेत. त्यांच्यावर मात केल्यास यश हमखास मिळत असल्याचे सांगितले. स्वत:च्या घरातील दु:ख विसरून त्यांनी सामाज कार्याला वाहनू गेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हॉ. पूर्णपात्रे यांनी ‘दु:ख म्हणजे दागिना नाही सर्वत्र मिरवत फिरण्याचा’ अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी वनबंधू परिषदेसाठी मदत देणार्‍या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.त्यात प्रामुख्याने महाविर प्रसाद मित्तल, श्याम ढेडीया, विजय अग्रवाल, नरेश कारडा,दिवाकर येवलेकर,संजय लोंढे, अजय मेहता, अमित टिबरेवाल आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी वनबंधू परिषदेचे निवड जालेलेअध्यक्ष प्रकाश लढ्ढा यांचा विशेष सत्कार खा. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक तापडीया यांनी केले.यावेळी जालेल्या चर्चा सत्रात खा. चंद्रा यांनी क्विट ऑर नॉट टू क्विट व ’वर्क-लाइफ बॅलन्स राखण्याचे महत्त्व’ या विषयांवर उपस्तितांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

*