ढगाळ वातावरणाने तापमानात वाढ तरीही नाशिक राज्यात सर्वात थंड

0
नाशिक | दि. २ प्रतिनिधी- काही दिवसांपासून नाशिकरांना थंडी जाणवू लागली असली तरी लहरी मोसमामुळे पुन्हा थंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरात दिवसभर थंड हवा वाहिल्याने वातावरणात गारठा होता. मात्र एकुण तापमानात मात्र एक अंशाने वाढ झाली असल्याचे चित्र आहे.

बंगालच्या उपसागरानंतर आता अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळ निर्माण झाले आहे. तर पुढील दोन दिवसात मुंबई सह पश्‍चिम किनार्‍यावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे तमपाणात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेने थंडीची तीव्रता कमी आहे. काही दिवसांपुर्वी १० अंश इतके तपमान खाली आले होते. मात्र मागील दोन दिवसात यामध्ये वाढ होत आहे. आज शहरात कमाल तापमान ३१ तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. असे असले तरी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षा नाशिकची थंडी अधिक असल्याचे समोर आले आहे.

मान्सूननंतर हिवाळा तरी वेळेत येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा चांगलाच जोर असल्याने ही अपेक्षाही फोल ठरली. आता नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून थंडीची चाहूल लागल्याने नाशिककर होते. थंडीचा कडाका अद्याप सुरू झाला नसला, तरी उष्णतेची तीव्रता मात्र कमी झाली आहे.

आज दिवसभरही शहरात थंड वारे वाहत होते. सायंकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत थंडी आणि त्यानंतर ऊन असे दोन्ही बदल नाशिककर सहन करत आहेत. गेल्या वर्षाची तुलना करता यंदाच्या महिन्यातील थंडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आता मुंबईसह सागरी किनार्‍यांवर ४ तारखेला अंशत: तसेच ५ तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते.

५ तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वारर्‍यांची तीव्रता अधिक असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल असे राज्य शासनाच्या

LEAVE A REPLY

*