Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

इथोपिया येथे १२ तासांत लावली ३० करोड झाडे

Share

नवी दिल्ली : पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने २९ जुलै रोजी अवघ्या बारा तासांत ३० करोड ५० लाख झाडे लावण्याचं विक्रम इथिओपिया देशाने लावले आहे.

इथिओपिया देशाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी एक दिवसीय वृक्षारोपण लागवड या उपक्रमांतर्गत ‘ग्रीन लीगेसी’ उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी इथिओपियन लोकांना आव्हानात भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. पहिल्या सहा तासांत अहमद यांनी ट्विट केले की जवळपास १५ करोड झाडे लावण्यात आली आहेत.

ते यावेळी इथिओपियन नागरिकांना म्हणाले, “आपण आपल्या ध्येयाच्या अर्ध्या टप्प्यात आहोत,” आणि पुढील तासांत लक्ष गाठण्यासाठी उर्वरित तासांत गती वाढवण्यास प्रोत्साहित केले.

१२ तासांचा कालावधी संपल्यानंतर इथिओपियाच्या पंतप्रधानांनी पुन्हा ट्विटरवर घोषणा केली की इथिओपियाने आपले वृक्षारोपणाचे ध्येय पूर्ण केले असून त्यापुढे जात आणखी वृक्षांची लागवड केली आहे. दरम्यान या उपक्रमांतर्गत येत्या ऑक्टोबर पर्यंत ४ बिलियन झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!