मनमाडजवळ इथेनॉल टँकर उलटला; गळती होत असल्याने परिसर सील

0
मनमाडपासून जवळ असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पा समोर इथेनॉल टँकर पलटी होऊन त्यातून इथेनॉल गळती होण्याची घटना आज रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच प्रकल्पातील अधिकारी नगर परिषदेचे अग्निशमन दल.पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इथेनॉल हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे खबरदारी घेत पोलिसांनी मनमाड व नांदगाव कडे येणारी-जाणारी वाहतूक थांबून परिसर सील केला होता.
टँकर पलटी झाल्या नंतर  सुदैवाने त्याने पेट घेतला नाही त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या बाबत अधिक वृत्त असे की नेवासा येथून भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पासाठी 15 लिटर इथेनॉल घेऊन  एम.एच.04,
इएन-9181 हा टँकर आला होता.
प्रकल्पाजवळ आल्यानंतर टँकर वळविताना चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी होऊन त्यातून इथेनॉल गळती सुरू झाली होती.
ज्या ठिकाणी टँकर पलटी झाला त्या भागात भारत पेट्रोलियम,इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प आहे त्यामुळे बीपीसीएल कंपनीचे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
टँकर पलटी झाल्याचे कळताच नगर परिषदेच्या अग्निशमन बंब आणि पोलीस ही अविलंब घटनास्थळी दाखल झाले .टँकर मधून मोठ्या प्रमाणात इथेनॉल गळती सुरू होती हा पदार्थ अत्यंत ज्वलनशील असल्यांने कंपनीचे अधिकारी व पालिकेच्या अग्निशमन दलाने टँकरवर फोम युक्त पाण्याचा मारा केला.
त्या नंतर क्रेन आणून टँकर उचलण्यात आला. टँकर पलटी झाल्यानंतर सुदैवाने त्याने पेट घेतला नाही नाही त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

*