गाळयुक्त शिवार समितीची स्थापना

0
अहमदनगर – गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेच्या संनियंत्रणाकरिता गावस्तरावर ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे.
राज्यातील 250 हेक्टर पर्यंतची सिंचन क्षमता असणार्‍या धरणांमधील गाळ काढणे व तो शेतात वापरणे यासाठी राज्यामध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
समित्यामध्ये संरपच – अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य (एक) – सदस्य, शेतकरी प्रतिनिधी – सदस्य, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी – सदस्य, तलाठी/ग्रामसेवक- सदस्य, संबंधित शाखा अभियंता – सदस्य सचिव.

LEAVE A REPLY

*