राज्यातील शंभर शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

0
अंदरसूल | राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याआदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागशालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्यात राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा कशा असतील याबाबत उत्तम उदाहरण राज्यासमोर ठेवतील अशा 10 आंतरराष्ट्रीय शाळा निर्मिती करण्याचे शासन विचाराधीन आहे.

या शाळा त्या विभागासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील अशा शाळांना ‘ओजस शाळा’ संबोधण्यात येईल. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल.

ओजस आंतरराष्ट्रीय शाळा त्यांच्या परिसरातील इतर 9 आंतरराष्ट्रीय शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करतील. या 9 शाळा ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखल्या जातील.

तेजस आंतरराष्ट्रीय शाळांसाठी सर्व महानगरपालिका क्षेत्रातून प्रत्येकी शाळा व सदर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किमान शाळा निवडण्यात येतील आदिवासी विकास विभाग व सार्वजनिक  न्याय विभागाच्या प्रत्येकी शाळा तेजस आंतरराष्ट्रीय शाळांसाठी निवडण्यात येतील.

तेजस आंतरराष्ट्रीय शाळांसाठी निवड प्रक्रियेतून उपरोक्त नमूद विभागवार शाळांच्या संख्येच्या अधीन राहून गुणानुक्रमे प्रथम 90 तेजस आंतरराष्ट्रीय शाळा निवडण्यात येतील.

ओजस आंतरराष्ट्रीय शाळा : कोकण विभाग (मुंबई वगळून) १ . पुणे विभाग (पुणेशहर वगळून) १ . औरंगाबाद विभाग २ नाशिक विभाग २, अमरावती विभाग २, नागपूर विभाग 2 एकूण १०

 तेजस आंतरराष्ट्रीय शाळा : कोकण विभाग ९ . पुणे विभाग ९ . औरंगाबाद विभाग १८, नाशिक विभाग १८ , अमरावती विभाग १८, नागपूर विभाग १८ एकूण ९०. 

LEAVE A REPLY

*