महापालिकेत स्वच्छ भारत सिटी युनीटची स्थापना – आयुक्तांची माहिती

0

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापलिाकेत स्वच्छ भार सिटी युनीटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.येत्या एक महिन्यात हे युनिट कार्यान्वीत केले जाणार असून त्याव्दारे स्वच्छतेच्या कामांना वेग देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील वर्षी स्वच्छतेबाबत चांगले काम व्हावे यासाठी भारत सरकारने नेमलेल्या कन्सल्टंट कंपनीशी करार करण्यात येणर आहे. त्यांतर्गत स्वच्छ भारत सिटी युनिटची स्थापना केली जाईल. स्वच्छतेशी निगडीत सर्व बाबींचे सर्वेक्षण करून त्यात काय सुधारणा करता येतील याबाबत हे युनीट सल्ला देणार आहे.

तसेच घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कप्पे आहेत की नाही, घनकचरयाचे व्यवस्थापन होते की नाही, शहरासाठी किती सफाई कर्मचारयांची आवश्यकता आहे. याची पाहणी करून योग्य त्या सूचना हे युनिट करणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

*