Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

मशिदीतील महिलांच्या प्रवेशासाठी एर्दोगन सरसावले

Share

अंकारा (तुर्की) ता. ५ (यूएनआय) : महिला आणि मुलांना मशिदीपर्यंत आणण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे निर्देश तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी आपल्या देशातील धार्मिक बाबींच्या संचालनालयाला (दियानेत) दिले आहेत.

हुरियत डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एर्देगॉन यांनी  म्हणाले की महिला पुरुषांनी मशिदीत एकत्र प्रार्थनर करणे निषिद्ध समजले जाते.

मात्र माझ्या दृष्टीकोनातून मुलांचा उत्साह आनंद, महिलांचे आशीर्वाद आणि श्रद्धा, तरुणांचा उत्साह आणि अनुभवी वयस्कर लोकांशिवाय मशिदी एकदम रित्या वाटतात, राष्ट्रपती भवनात धर्मगुरूंना ते संबोधित करत होते.

या देशातील धर्म आणि मशिदींबद्दच्या सर्व समस्यांवर खुली चर्चा घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हे माझे कर्तव्य समजतो. महिलांना मशीदीत पाठवू नका असे कुराणात म्हटले आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

मी कधीही अशा बंदीसंदर्भात ऐकले नाही किंवा माझ्या धर्म शिक्षकांनीही (मुफ्तीसाहब) मला तसे काही शिकवले नाही, त्यामुळे अशा चुकीच्या प्र्‍था आणि समज आता दूर सारायला हव्यात असेही आवाहन राष्ट्राधक्ष एर्दोगन यांनी केले.

लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी काही ठराविक दहशतवादी संघटना इस्लाममधील गैरसमजुतींचा वापर करून घेत आहेत. दियानेतने (धार्मिक संचालनालय) असे प्रकार बंद करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत असेही एर्दोगन म्हणाले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!