Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

तळई येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Share

तळई, ता.एरंडोल । वार्ताहर

येथील दिपक भगवान पाटील (वय 24) या अविवाहीत तरूणाने त्याच्याच शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.

या प्रकरणी कासोदा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक हा घरातील कर्ता होता. त्याचे आजोबा वयोवृध्द झाले असून वडिलांना देखील चालण्याचा त्रास आहे. मोठा भाऊ देखील मुका आहे. दिपकच्या आत्महत्येचे कारण न समजल्याने त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे शवविच्छेदन कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्याच्या पश्चात आजोबा, आई, वडील भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!