प्लास्टीक बंदीबाबत चर्चेसाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक | राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून आज सायंकाळी ते नाशकात पोहोचतील.

उद्या दुपारी त्यांची प्लास्टिक बंदी विषयाबाबत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला ते हजेरी लावतील. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत.

कदम आज सायंकाळी ते शिर्डी येथून शासकीय वाहनाने नाशिककडे येतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता हॉटेल ताज (मुंबई-आग्रा रोड, नाशिक ) येथे आगमन व मुक्काम असेल.

शुक्रवार (दि. 24) रोजी सकाळी 10.00 वाजता शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत हॉटेल ताज येथे चर्चा करतील.  दुपारी ते प्लास्टीक बंदी विषयाबाबत सर्व संबधितासमवेत बैठक घेणार आहेत.

आयुक्त कार्यालयाजवळ असणाऱ्या महाराष्ट्र एन्व्हायरमेंटल इंजिनिअरींग ट्रेनिंग सेंटर व रिसर्च सेंटर ॲकेडमी (मित्रा सभागृह) येथे ते भेट देणार आहेत.

त्यानंतर कदम उद्या दुपारी मुंबईकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

*