महाराष्ट्रातून माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर

0

नवी दिल्ली : माळढोक या पक्ष्याचं नाव आता सर्वाना परिचयाचं झालं आहे. परंतु आज महाराष्ट्रातून माळढोक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. माळढोक वाचवा, वन्यजीव वाचवा अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. आज भारतामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीमध्ये माळढोकचे नाव सर्वात पुढे आहे.

२०११ च्या वन्यजीव जगणनेनुसार २५० माळढोक असावेत असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला होता. मात्र आता माळढोकांची संख्या त्यापेक्षा कितीतरी कमी आहे असं पक्षी अभ्यासकांच मत आहे. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे.

माळढोक हा पक्षी भारतासोबत पाकिस्तान आणि एकूणच भारतीय उपखंडात हा मोठ्या संख्येने आढळत असे. माळढोक पक्षी भारतात फक्त आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राज्यस्थान या राज्यात आढळतो.
महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे अहमदनगर, नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो . सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्षांसाठी संरक्षित अरण्य स्थापन केलंय.

सध्या भारतात २०० हुन कमी माळढोक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. नैसगिर्क शत्रू आणि विपुल प्रमाणात झालेली शिकार यामुळे माळढोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

माळढोक पक्ष्याची वैशिठ्ये : माळढोक हे गवताळ प्रदेशात राहतात. माळढोकची उंची साधारण १ मीटर पर्यंत असते. पिवळसर पंख, पांढरी मान डोक्यावर काळ्या टोपीसारखी पिसं आणि तुरा हे या पक्ष्याचं वैशिट्य
जमिनीवरच अंड दिल्यामुळे मादीला त्याची फारच काळजी घ्यावी लागते. कावळे व इतर प्राण्यांपासून अंड्याचं आणि पिलांचा रक्षण कारण सोपं नसत. गवताळ प्रदेशात आढळणारे छोटे-मोठे किडे, टोळ, बिया हे माळढोकांचं प्रमुख खाद्य आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात एका माळढोकाचा विजेच्या तारांना धडकून मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये माळढोकचा केवळ एकाच नर शिल्लक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यात माळढोकची मादी एकाच अंड देते.

आपल्या देशाच्या पर्यावरण घटकातील आणखी एक जीव नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने शासन तसेच प्रत्येक नागरिकाने यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*