Type to search

ब्लॉग सार्वमत

मनोरंजन क्रीडा प्रकार : डब्ल्यूडब्ल्यूइ

Share

म्हटले तर कुस्ती, म्हटले तर मुष्टियुद्ध अन् म्हटले तर मारामारी, हाणामारी वगैरे प्रकार म्हणजे ‘डब्ल्यूडब्ल्यूइ’ अर्थात ‘वर्ल्ड रेसलिंग एण्टरटायन्मेंट, म्हणजेच कुस्तीचे मनोरंजक विश्व. हा कुस्तीचा प्रकार असला तरी यास जागतिक क्रीडा प्रकारात खेळ म्हणून मान्यता नाही. मनोरंजनाच्या विश्वात हा प्रकार मोडतो.

‘डब्ल्यूडब्ल्यूइ’ ही अमेरिकेतील सार्वजनिकरीत्या मनोरंजन स्तरावर व्यवसाय करणारी खाजगी कंपनी आहे. यासाठी चित्रपट, संगीत आदी क्षेत्रांतून महसूल मिळविला जातो. या कंपनीचे विन्स मॅकमहोन आणि त्यांच्या पत्नी लिंडा मॅकमहोन हे मूळ मुख्य कार्यकारी अधिकारी होत. आता त्यांची मुले शेन मॅकमहोन आणि स्टेफनी मॅकमहोन हे प्रमुख आहेत. ‘डब्ल्यूडब्ल्यूइ’मधील होणार्‍या आर्थिक फायद्यातील 70 टक्के हिस्सा मॅकमहोन परिवाराला मिळतो. शिवाय त्यांना 96 टक्के मतांचे अधिकारी आहेत. या कंपनीचे वैश्विक मुख्यालय 1241, इस्ट मेन स्ट्रीट, स्टॅमफोर्ड कनेक्टिकट येथे आहे. न्यूयॉर्क आणि लॉस एंजिल्स येथे कंपनीची कार्यालये आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कार्यालये लंडन आणि टोरँटो येथे आहेत. या कंपनीचे मूळ नाव टायटन स्पोर्ट्स असे होते.

नंतर ते ‘वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन एणटरटेन्मेंट असे झाले व आता ‘वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट या नावाने ही कंपनी ओळखली जाते. ‘डब्ल्यूडब्ल्यूइ’ उद्योगाचा प्रकाशझोत व्यावसायिक कुस्तीवर आहे. ही एक बनावटी खेळ आणि प्रदर्शन यांची संयुक्त कला आहे. थिएटर मध्ये होणार्‍या कुस्तीला जोडून हा खेळ पूर्ण केला जातो. या कंपनीला या उद्योगातून 2007 साली 48 कोटी 60 लाख अमेरिकन डॉलर इतका महसूल मिळाला. त्यातून पाच कोटी 20 लाख अमेरिक डॉलर निव्वळ नफा आहे.

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये ‘डब्ल्यूडब्ल्यूइ’चे प्रयोग होत असतात. मोठ्या प्रमाणावर लोक तिकिटे काढून हे शो पाहत असतात. या प्रयोगातून सध्याच्या काळात ‘अंडरटेकर, जॉन सेना, द मिझ, बिग शो, ख्रिस जेरिको, कोफी किंगस्टन, डॅनियल ब्रायन, रोमन रेन्स, सेथ रोलिन्स, डीन अ‍ॅम्ब्रोस, मार्क हेन्री, ए. जे. स्टाईल्स, शेमस, द रॉक, भारतीय कुस्तीगीर द ग्रेट खली तर महिलांमध्ये निकी बेला, रोंडा रुसी, लिसा अशी नावे ठळकपणे घेता येतील. यातील बहुतांश लोकांची ही मूळ नावे नसून त्यातील अनेकांची ‘डब्ल्यूडब्ल्यूइ’साठी विशेष नावे दिलेली आहेत.

– प्र. के. कुलकर्णी,
7448177995

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!