धनुषच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित!

0

साऊथ सुपरस्टार धनुषच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक सगळ्यांसमोर आला आहे.

‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धनुष आता ‘द एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. केन स्कॉट दिग्दर्शित या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज आऊट झाले.यात धनुष निळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसतोय. त्याच्यासोबत फ्रेंच अभिनेत्री बेरेनाइस बेजो दिसतेय.

‘द एक्स्ट्राआॅर्डिनरी जर्नी आॅफ द फकीर’ हा चित्रपट एका भारतीय मुलाच्या असामान्य प्रवासावर आधारित आहे. या चित्रपटात एरिन मोरियार्टी, सराह जेने लेब्रोससारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट रोमेन पोर्टलसच्या ‘The Extraordinary Journey of the Fakir Who Got Trapped in an Ikea Wardrobe’ या कादंबरीवर बेतलेला आहे. ही कादंबरी 2014 मध्ये प्रकाशित झाली होती.

आत्तापर्यंत 35 भाषांमध्ये तिचे भाषांतर झाले आहे. आपल्या पित्याच्या शोधात निघालेल्या एका भारतीय मुलाची कथा यात सांगितली गेली आहे. पॅरिस, रोम, बुसेल्ससह भारतात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शूटींग झालेय.

 

 

LEAVE A REPLY

*