Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदेशात पुरेशी साखर – इस्मा

देशात पुरेशी साखर – इस्मा

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा सर्व उद्योगांवर परिणाम झाला आहे. तसेच साखरेसह आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पण देशात पुरेशी साखर आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जायचे कारण असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA­) ने म्हटले आहे.

इस्मा ने सांगितल्यानुसार कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाउनमुळे सुरुवातीला ट्रक उपलब्ध नसल्याने साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, पण केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे, गेल्या 4-5 दिवसांत स्थिती सुधारली आहे.

- Advertisement -

यावेळी देशभरात केवळ 186 साखर कारखान्यातच गाळप सुरु आहे. या हंगामात आतापर्यंत 232.74 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. तर गेल्या गाळप हंगामात या दरम्यान 296.82 लाख टन उत्पादन झाले होते. कुठेही ऊस उपलब्ध असेल, तिथे शेतकर्‍यांना कसलीही बाधा येऊ नये यासाठी कारखाने प्रयत्न करत आहेत. आणि त्या क्षेत्रातील साखर कारखाने सुरु आहेत असे इस्मा ने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या