Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

विश्वचषक : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Share

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था 

आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर  उभे ठाकले आहेत. इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंटब्रिज मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंड संघाने आपल्या सलामी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर १०४ धावांनी मात करून विजयी सुरुवात केली आहे. आता पाकिस्तानवर मात करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी इंग्लंड सज्ज आहे.

तर पाकिस्तान इंग्लंडवर मात करून स्पर्धेतील आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. या मैदानावर एकूण १७ हजार प्रेक्षक बसू शकतात.

हे मैदान नॉटिंगहॅमशार या संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ६ बाद ४८१ इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ जून २०१८ तर नीचांकी धावसंख्या ८३ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड २६ ऑगस्ट २००८ अशी आहे.

या मैदानावरील सर्वात मोठा विजय इंग्लंड २४२ धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ जून २०१८. निसटता विजय विंडीज ३ धावांनी २० जुलै २०००
सर्वाधिक विकेट्स डी पॉवेल १० षटके २ निर्धाव ४० धावा ४ विकेट्स २००७ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज इऑन मॉर्गन २००९-२०१८ १३ सामने ११ डाव ४६२ धावा सर्वाधिक स्कोर ११३ १ शतक ३ अर्धशतके  इंग्लंड संघाच्या फलंदाजीची मदार जेसन रॉय , जॉनी बेरस्टो , जोस बटलर , जो रूट , ईयोन मॉर्गन यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये मोईन अली , लियम प्लंकेट , क्रिस वोक्स आहेत गोलंदाजीत मार्क वूड , आदिल रशीद , टॉम करण मोईन अली आहेत.

पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार फकर झमान , इमाम उल हक , मोहंमद हाफिज , शोएब मलिक , सर्फराज अहमद यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये इमाद वासिम , शादाब खान , फहीम अश्रफ आहेत. गोलंदाजीत शाहीन आफ्रिदी , जुनैद खान , मोहंमद अमीर , हसन अली हे पर्याय आहेत

आमनेसामने ८७ इंग्लंड विजयी ५३, पाकिस्तान विजयी ३१ ३ अनिर्णित

यांच्यावर असेल लक्ष : जॉनी बेरस्टो , जेसन रॉय , बेन स्ट्रोक्स , शोएब मलिक ,

हवामान : किरकोळ ढग आणि उष्णता राहण्याचा अंदाज

संभाव्य क्रमवारी इंग्लंड १२५ गुणांसह अव्वल स्थानी पाकिस्तान ९४ गुणांसह सहाव्या स्थानी

पाकिस्तान : इमाम उल हक , फकर जमान , अझर अली , अबिद अली , मोहंमद हाफिज , शोएब मलिक , सर्फराज अहमद , असिफ अली , बाबर आझम , हरीस सोहेल , हसन अली , इमाद वासिम , शादाब खान , जुनैद खान , मोहंमद अमीर , शाहीन आफ्रिदी मोहंमद हंसन , वाहब रियाज फहीम अश्रफ

इंग्लंड : जेसन रॉय , जोस बटलर , जॉनी बेरस्टो , जो रूट , मोईन अली , बेन स्ट्रोक्स , क्रिस वोक्स , लियम प्लंकेट , आदिल रशीद , जाफ्रा आर्चर , टॉम करण , लियम डॉसन , जेम्स व्हींस , जो डेंली , अलेक्स हेल्स , डेविड विली

सलिल परांजपे नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!