Deshdoot Impact : अभियांत्रिकीचा निकाल लागला; विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात

आरटीओ मुख्य परिक्षेचे फॉर्म भरता आल्याने विद्यार्थी समाधानी

0
नाशिक । पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेचा निकाल काल मध्यरात्रीच्या सुमारास घोषित करण्यात आला. यंदा निकाल लागण्यास उशिर झाल्यामूळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. तसेच अभियांत्रीकीचे काही विद्यार्थी आरटीओ पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाले होते.

पदवी परीक्षेचा निकाल न लागल्यामूळे त्यांना मुख्यपरिक्षेचा अर्ज करण्यासाठी अडचणींंना सामोरे जावे लागत होते. मात्र ‘दैनिक देशदूत’च्या वृत्ताची दखल पुणे विद्यापीठाने घेत काल (दि.13)मध्यरात्री पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल झळकवला. यामूळे विद्यार्थी समाधानी झाले असून त्यांनी दैनिक देशदूतचे आभार मानले आहेत.

30 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आरटीओच्या 833 पदांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. मॅकॅनिकल पदवीधारक आणि पदवीच्या शेवटच्या वर्षात असणार्‍या विद्यार्थ्यांनीदेखील ही परीक्षा दिली होती. मात्र मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतांना प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीचे गुणपत्रक तसेच निकालाची तारीख भरणे आवश्यक असल्याचा आयोगाचा नियम आहे.

त्यामुळे विशेषत: पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतांना गुणपत्रक आणि निकालाची तारीख आवश्यक होती. निकाल न लागल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची भीती त्यांना वाटू लागली होती. मात्र देशदूतने विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेत विद्यापीठाचे वृत्ताच्या माध्यमातून लक्ष वेधले. विद्यापीठानेही या वृत्ताची दखल घेत दुसर्‍याच दिवशी निकाल लावल्याने विद्यार्थ्यांचा जीवात जीव आला. निकाल संकेतस्थळावर झळकल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुठलाही विलंब न करता आरटीओच्या मुख्य परिक्षेसाठी अर्ज केले आहेत.

अधिकारी होण्याचे स्वप्न निकाल न लागल्यामूळे भंग होईल की काय अशी भीती असणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निकाल लावून सुखद धक्का दिला. त्यामूळे विद्यार्थी अधिकारी होण्याच्या शर्यतीत कायम असून त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

देशदूतचे आभार : विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत दैनिक देशदूत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्यामूळेच आज आम्ही आमचे मुख्य परिक्षेचे फॉर्म भरू शकलो. विद्यापीठानेही समस्येचे निरसन करत दुसर्‍याच दिवशी निकाल लावत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत केली.
मनीष देवरे, विद्यार्थी

११ जुलैला आलेली बातमी 

अभियांत्रिकीचा निकाल लांबणीवर; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर

LEAVE A REPLY

*