औषधनिर्माणच्या जागांमध्ये वाढ, तर अभियांत्रिकीच्या जागांत घट

0
नाशिक : यंदा नाशिक विभागात औषधनिर्माणच्या जागांमध्ये 250 ची वाढ करण्यात आलेली आहे तर अभियांत्रिकीच्या सुमारे 2 हजार जागा कमी करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रवेशासाठी अभियांत्रिकीसाठी 17 हजार 788 जाा उपलब्ध असतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकीच्या साडे सतराशे जागा घटविण्यात आल्या आहेत. 5 जून पासून अभिभयांत्रिकी प्रवेशाला सुरवात झाली आहे.

प्रवेशासाठी 17 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. मागील काही वर्षांपासून महाविद्यालयांची संख्या वाढल्याने तसेच विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याने अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहू लागल्या आहेत. त्यामुळे जागा कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्हयांसाठी 19 हजार 541 जागा उपलब्ध होत्या परंतु यासाठी केवळ 8 हजार 800 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. सुमारे 10 हजार 741 जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा साडेसतराशे जागा कमी करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान औषधनिार्माणच्या जागात नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या पाचही जिल्हयातील 38 महाविद्यालयातील जागांमध्ये वाढ करण्यात आली असून यंदा 2 हजार 990 जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी याच जागा 2 हजार 747 होत्या. यंदा त्यात 250 नी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्याही प्रवेशाला सुरवात झाली असून या महिनाअखेरपर्यत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*