Photo Gallery : सायखेड्यात मेनरोडने घेतला मोकळा श्वास

0

निफाड : सायखेडा येथे सायखेडा ग्रामपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त कारवाईत सायखेडा खानगाव रस्त्याने मोकळा श्वास घेतला. हा रस्ता शहरातून अनेक अनेक गावांना जोडला जातो. अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते.

यासंदर्भात रीतसर नोटीस गेल्या काही दिवसांपूर्वी बजावण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी अतिक्रमण काढून घेतले पण ज्यांनी काढले नव्हते त्यांचे अतिक्रमण आज बुलडोझरने काढण्यात आले.

अतिक्रमण हटाव मोहिमेत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

*