Thursday, May 2, 2024
Homeनगरअतिक्रमणाच्या नोटिसांमुळे गोंडेगाव व्यावसायिक गाळेधारक अडचणीत

अतिक्रमणाच्या नोटिसांमुळे गोंडेगाव व्यावसायिक गाळेधारक अडचणीत

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव ग्रामपंचायतीने गावातील हनुमान मंदिर परिसरातील आठ व्यावसायिक गाळे धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसा बाजवल्या असून अतिक्रमण काढण्यासाठी ठरविक दिवस दिल्यानंतर गाळेधारकांनी या नोटीसांबाबत पंचायत समितीकडे दाद मागीतली असता बीडीओ यांनी एक समिती स्थापन करून श्री. अभंग व श्री. शेख ग्रामपंचायतीत चौकशीसाठी आले असता गाळेधारकांनी त्यांच्यासमोर आरडाओरड करत दाद मागितली. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

समितीने ग्रामविकास अधिकारी, सरपंच व आठ गाळाधारकांच्या व्यथा जाणून घेत प्रत्यक्ष जागेची पाहणी व कागदपत्र तपासले. त्यानंत ते निघून गेले. ते आपला अहवाल बीडीओ यांना देणार असून त्यानंतर काय निर्णय होतो, यासाठी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सदर जागेवर व्यावसायिक कॉम्प्लेक्स बांधायचे असून वेशीजवळ व रस्त्याच्या कडेला अतिक्रमण कमी करून स्वतंत्र गाळे बांधायचे आहे. परंतू या जुन्या गाळ्यांना लाखो रुपये खर्च करून हे व्यावसायिक गाळ्यामध्ये आपली रोजी रोटीसाठी व्यावसाय करीत आहेत. त्यांची रोजी रोटी ग्रामपंचायत बंद करणार का? किंवा काही दिवसाकरीता पर्यायी जागा उपलब्ध करून देणार का? असाही प्रश्न गाळेधारकांना पडला आहे.

आठ गाळेधारक व काही नागरीकांनी याबाबत खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तहसिलदार प्रशांत पाटील यांच्याकडे सरपंच ग्रामविकास अधिकारी व नागरीकांची व्यथेसंदर्भात चर्चा केली. परंतु त्या संदर्भातील काही माहीती उपलब्ध होवू शकली नाही.

काही दिवसांपूर्वी गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी व्यावसायिक गाळेधारकांना तहसिलदार यांच्याकडून नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. परंतु गायरान जमिनीसंदर्भात खंडपिठाचा पुढील काही निर्णय न आल्याने जैसे थे राहील्याने या जमिनीवर नेमका हक्क ग्रामपंचायतचा कि शासनाच्या गायरान विभागाचा? या गाळेधारकांना दोन्ही प्रशासनाने नोटीसा बजावल्याने हे अतिक्रमण नेमके कुणाचे? यामुळे गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील पुढार्‍यांनी यामध्ये राजकारण न करता समझोता करून प्रश्न सोडविला पाहिजे, अशी चर्चा नागरीक करत आहेत.

जे बांधकाम पाडवायचे आहे तेथे प्रशस्त 32 व्यावसायिक गाळे तयार होतील, असा आराखडा तयार आहे. परंतु विरोधक फक्त राजकारण करत आहेत. गावात अशी दोन कॉम्प्लेक्स बांधवायचे आहे. सदर जागेत एकच भोगवटदार ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या गाळ्यात व्यवसाय करीत असून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. आम्हाला कोणाही गाळेधारकांची रोजीरोटी हिसकवयाची नसून या आठ गाळेधारकासह आणखी 24 युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सदर कॉम्प्लेक्सचे नाव येडुआई माता कॉम्प्लेक्स असेे आहे. यासाठी लवकरच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून निधी उपलब्ध होणार असून विरोधकांनी गावाच्या विकासात आडवे येऊ नये.

– सागर बढे, सरपंच, गोंडेगाव

आम्ही सर्व व्यवसायिक गाळेधारक गेली अनेक वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीतील जागेत ग्रामपंचायतीच्या परवानगीने व्यवसाय व उदरनिर्वाह करीत आहोत. वेळोवेळी ग्रामपंचायत करही भरलेला आहे. ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांनी राजकीय द्वेषापोटी गावातील गाळेधारकांना वेठीस धरू नये.

– अण्णासाहेब विठ्ठल फोपसे, गाळाधारक

- Advertisment -

ताज्या बातम्या