Type to search

Featured सार्वमत

वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कोपरगावी 30 जणांना पोलीस कोठडी

Share

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- करंजी शिवारात वन विभागाच्या राखीव जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे व वनविभागाच्या अधिकार्‍यांना त्याठिकाणी वृक्षरोपणाला विरोध केल्यामुळे 23 महिला व 7 पुरुष अशा 30 जणांवर वन खात्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली असून तीसही आरोपींना न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अतिरिक्त वनपाल भाऊसाहेब संपत गाढे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हंटले की, 27 जून ते 11 जुलै दरम्यान करंजी राखीव वन गट नंबर 440 ,443 ते 445 (कक्ष क्रमाक 240 ) मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा सुरू होता. त्या वनात करंजी शिवारातील आदीवासी यांनी बेकायदेशीर रित्या राखीव वनात घुसून झाडे, हद्द खुणा नष्ट केल्या व वन्य प्राण्याच्या अधिवसाला क्षति पोहचवणे, रोपेची नासधूस केली ,त्यांच प्रमाणे वन विभागाचे आधिकारी वृक्ष रोपण करताना विरोध केला तसेच शिवीगाळ करून धमकावले असता.या आदिवासी यांनी वन अधिकार्‍यांना तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे या सर्वाना कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता व 30 जनाविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1 )अ ,ड ,फ,ह.52 61 (2 )ि 63 ,65 अ ,भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 34 ,144 149 ,353 ,411 ,427 व जैव विविधता अधिनियम 2002 चे कलम 5 ,6 ,7 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला तसेच न्यायालयाने या तीस आरोपींना दि 17 जुलै पर्यंत आरोपी रायभान विठ्ठल आहेर (45 ),कुंज रतन आहेर (56 ),भानदास कारभारी आहेर (43 ), ज्ञानदेव विठ्ठल आहेर (45 ), शिवाजी भिवा मोरे (40), राजू काशिनाथ आहेर (40 ), वाल्मिक रतन निकम (32 ),बबबाई शिवाजी मोरे (45 ),लक्ष्मीबाई दत्तू आहेर (40 ),अलका सोपान पवार (40 ) ,भारती पांडुरंग निकम (25 ), लताबाई रतन निकम (55 ),कडू बाई अंबादास पवार (40 ),हिराबाई शिवाजी आहेर (50 ),मंदाबाई सुभाष आहेर (55),सखुबाई बबन बर्डे (55),मुक्ताबाई रामदास मोरे (50),मीराबाई सुरेश आहेर (52 ) ,मीराबाई लक्ष्मन आहेर (45),उषा धर्मा मोरे (32), विठाबाई निवृत्ती आहेर (60),शोभा बाबासाहेब गायकवाड (25) ,अलका भाऊराव आहेर (32), लता ज्ञानदेव आहेर (50 ), मंदा भास्कर आहेर (24), गिरीजा बाई संपत आहेर (55) ,मीराबाई भिका आहेर (57),गंगू बाई यादव मोरे (48) ,सत्त्याभामा भीमा गायकवाड (20) ,मोनिका ज्ञानदेव आहेर (30)अश्या तिसही आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाई मध्ये उपवन संरक्षक अहमदनगरचे आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक आर.जी .देवखिळे ,एस. आर. पाटील,के. आर. सोनवणे ,वन परिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव,जी. डी .छबीलवाड ,अश्विनी दिघे,प्रताप जाधव ,गाडे बी.एस.एम एल मोरे, यांचा समावेश होता.

पुरूष नगरला, महिलांची येरवडात रवानगी
कोपरगाव सब जेलमध्ये जागा अपुरी असल्यामुळे पुरुषांची रवानगी अहमदनगर येथील सब जेल मध्ये तर 23 महिलांची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!