Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सशक्त, स्वास्थ्य , सक्षम पोलिसिंगवर भर – रश्मी शुक्ला

Share

अधिकार्‍यांच्या विशेष प्रशिक्षणाचा समारोप

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस निरिक्षक ते पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांसाठी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या वतीने नवा प्रशिक्षण र्काक्रम सुरू केला असून याद्वारे सशक्त स्वास्थ्य व सक्षम पोलीस अधिकारी व एकंदर पोलिसिंग करण्यात येणार असल्याचे मत राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे सशक्त स्वस्थ व सक्षम पोलीस प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्ला यांच्या हस्ते प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला.

रश्मी शुक्ला म्हणाल्या, पोलीस दलात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी 60 टक्के वेळ हे कामासाठी देतात. यातून मानसिक ताणतणाव निर्माण होऊन याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच कामावरही होतो. याचा परिणाम कर्मचारी, सामाजिक स्थितीवर पडतो. म्हणून प्रत्येक पोलीस अधिकारी हा शाररिक तसेच मानसिकरीत्या पुर्ण तंदुरूस्त राहायला हवा.

पोलीस अधिकारी स्वास्थ असले की आपोआप पोलिसींग सक्षमपणे सशक्तपणे करून समाजाला सुरक्षीत ठेवणे शक्य होणार आहे. अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतानाच अधिकार्‍यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून नका असा सज्जड दमही भरला. अन्यथा सामाज तसेच कुटुंबिय आपणास माफ करणार नाहीत असे त्यांनी सांगीतले.

समारंभांचे प्रस्ताविक करताना दोरजे यांनी प्रबोधिनीच्या उपक्रमांचा आढावा घेत कर्मचारी अधिकार्‍यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेता यावे यासाठी चांगले उपक्रम राबवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाम निकम यांनी केले.

या प्रसंगी पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे, उपसंचालक घनशाम पाटील, नंदकुमार ठाकुर, लांजेकर, सहसंचालक संजय मोहिते, प्रशिक्षक केतन गंवाद, ब्रायन लोगो आदी उपस्थित होते.

प्रबोधिनीत हा उपक्रम कायम – दोरजे 

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जस्वाल यांच्या संकल्पनेतून पोलीस निरिक्षक ते पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सशक्त, स्वास्थ्य व सक्षम पोलीस हा उपक्रम महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत आता कायम राबवण्यात येणार असल्याचे प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे यांनी देशदूतशी बोलताना सांगीतले.

दोरजे म्हणाल्या, 14 दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असून 38 अधिकारी या बॅचमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. पोलीस अधिकार्‍यांना काम करण्यासाठी त्यांना स्वस्थ असणे सक्षक्त व ते कार्यक्षमता वाढून सक्षम होणे आवश्यक आहे. यापुर्वी खंडाळ्यात दोन बॅच पुर्ण झाल्या असून तिसर्‍या टप्प्यात येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत हा उपक्रम आता सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये मोक्का, अ‍ॅट्रोसीटी अशा गुन्ह्यांचा तपास पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना करावा लागतो. पोलीस निरिक्षकांची पदोन्नती झाल्यानंतर त्यांना अशा सर्व मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाची परिपुर्ण माहिती, त्यांच्या हाताखाली असणारे अनेक पोलीस ठाणी, पथके, इतर अधिकारी कर्मचारी यांचे नेतृत्व व व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

योगा, ट्रेक्स, फायरींग, खेळ, मार्गदर्शन, तपास, सायबर अशा विविध पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी मोठी तयारी करण्यात आली.उत्कृष्ट प्रशिक्षक, वातावरण, हॉल, राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था तसेच प्रशिक्षणातच हसत खेळत अगदी ट्रेकिंग, चित्रपट पाहणे, खेळणे कुटुंबियांसमावेत फिरणे, आनंद लूटने असा सहभाग असल्याने हे प्रशिक्षण आंनददायी पद्धतीने देण्यावर भर देण्यात आला आहे. याद्वारे आपण सशक्त पोलीस यंत्रणा उभी करू असा विश्वास आहे.


आयुष्याची उत्तम शिदोरी

हे प्रशिक्षण शाररिक, मानसिक व्यावसाययिक दृष्टीने सर्व दृष्टीने वेगळेपणे होते. कामाच्या व्यापात आम्ही आरेाग्याकडे दुर्लक्ष करत होतो. तसेच इतर खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या ही उत्तम शिदोरी आम्ही घेऊन जात असून संपुर्ण आयुष्यासाठी याचा पयोग होणार आहे.

– मंगलसिंग सुर्यवंशी, नाशिक


सशक्त झालो

सेवाअंतर्गत हे प्रशिक्षण झाले. आतापर्यंत 30 वर्षाच्या सेवा कालावधीत असे प्रशिक्षण झाले नाही असा अनुभव आला. खर्‍या अर्थाने आम्ही स्वास्थ्यासाठी प्रयत्न करू, सक्षम आणि सशक्त नक्की होऊ.

नईम हश्मी, औरंगाबाद

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!