कर्मचारयांच्या हितासाठी विमा कर्मचारी सेना कटीबध्द – अध्यक्ष आ. सुनिल शिंदे

0
नाशिक | भारतीय विमा कर्मचारी सेना कर्मचारयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेत असते. आजवर संघटनेने कर्मचारयांच्या अनेक मागण्या पूर्ण केलेल्या असून भविष्यातही कर्मचारयांच्या हितासाठी विमा कर्मचारी सेना कटीबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील शिंदे यांनी केले.

नाशिक येथील एचआरडी सेंटर येथे सुरू असलेल्या नाशिक विभागीय अधिवेशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे नितीन विखार, सरचिटणीस चंद्रशेखर ठाकुर, मुंबई सरचिटणीस महेश लाड, वरीष्ठ मंडल प्रबंधक प्रदिप शेर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनील शिंदे पुढे म्हणाले की, वेतन कराराचा प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात आलेला आहे. यापुढे पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.गृह कर्ज, क्रेडीट को ऑप सोसायटी ताब्यात घेण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे. हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील.

अजूनही काही मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी कामगार चळवळ बळकट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सरचिटणी चंद्रशेखर ठाकुर म्हणाले की, अस्टिटंट बदल्या झाल्याच आहेत. त्या बदल्या आमच्यामुळेच झाल्याचा ढोल बाकीच्या संघटना पिटत आहेत. त्यामुळे एचजीए बदल्यांबाबत आपण पाठपुरावा करीत आहेत.

आपली संघटना व्यवस्थापनाशी पाठपुरावा करून या बदल्या निश्चित करून घेईल. आपल्या संघटनेतील व्यक्तीची क्लास वन पदावर वर्णी लावतांना अन्याय केला जातो. ही दडपशाही आपण बरयाच अंशी कमी केलेली आहे. संस्थेच्या व कर्मचारंयाच्या हिताकरीता आपला हा व्यवस्थापनावर असलेला धाक, दरारा कायम ठेवायचा आहे. त्यााठी सर्वांची 100 टक्के एकजूट आवश्यक आहे. तर आपली संघटना मजबुत करावयाची असेल तर आपली सभासद संख्या वाढविली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकर घेण्याची आवश्यकता आहे.

यावेळी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमासाठी काळू काळे, भरत तेजाळे, रविंद्र वारे, गणेश औटी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*