कर्मचार्‍यांतून अधिकारी बनलेल्या पोलीसांचा सन्मान

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- खडतर प्रवास करत पोलीस कर्मचारी असतांना खात्याअंतर्गत परीक्षा देत पोलीस उपनिरीक्षक झालेल्या 11 अधिकार्‍यांचा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सन्मान केला. पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक झालेल्या 8 अधिकार्‍यांचा देखील पोलीस मुख्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद भोईटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पोलीस कर्मचार्‍यांच्या खात्याअंतर्गत पीएसआय पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात नगरच्या 11 कर्मचार्‍यांनी बाजी मारुन अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यात परशुराम बाबासाहेब दळवी, विजय किसन साठे, शंकर अर्जुन शिरसाठ, सागर भाऊसाहेब काळे, भानुदास भाऊसाहेब नर्हे, चांगदेव बबन हांडाळ, बाबासाहेब किसन भवर, अमोल नारायण गर्जे, शहाबाज झुबेर शेख, देविदास राहिदास साळवे संजय पंढरीनाथ नाईक अशा 11 जणांचा सन्मान करण्यात आला आहेत.

पोलीस निरीक्षक ते उपअधिक्षक म्हणून अंकुश दादासाहेब इंगळे व अनिल हरिश्‍चंद्र शिंदे (आर्थिक गुन्हे शाखा) सोमनाथ एकनाथ मालकर यांना बढती मिळाली आहे. तसेच सद्या नगरमध्ये कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक भरत दत्तात्रय जाधव (राजूर), अजित तुकाराम चिंतले (जामखेड), विश्‍वनाथ बाळु सिद (श्रीगोंदा), इसामुद्देन नसीर पठाण (तोफखाना), विलास कमलाकर कुलकर्णी (जामखेड), विकास सुखदेव देवरे (शिर्डी) विनय गोविंद सरवदे (संगमनेर शहर) अशा सात जणांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे.

पोलीस कर्मचारी अधिकारी झाले पाहिजे. त्यासाठी पोलीस दलाकडून खास विशेष क्लास सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचार्‍यांचे मुलभूत प्रश्‍न सुटले पाहिजे, त्यांचे आरोग्य, कुटुंब, मुलांचे शिक्षण, घराजवळ नोकरी अशा अनेक गोींसाठी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मार्गी लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणून कर्मचारी व अधिकार्‍यांकडून योग्य कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*