अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

0

पंचवटी । पंचवटीतील पेठरोड येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरांत दुपारच्या सुमारास दोघा संशयीतांनी एका 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाललैगीक अत्याचार व अनैसर्गिक कृत्य आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेठरोड परिसरात राहत असलेला 11 वर्षीय मुलगा काल दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास दिंडोरी रोड येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरांत असतांना याठिकाणी संशयीत काळू चव्हाण(रा.भराडवाडी, पंचवटी) व रुतीक शिंदे हे दोघे आले.

त्यांनी या मुलास आपल्या स्कुटी वाहनावरून पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट मधील डाळींब मार्केटच्या शौचालया शेजारी घेवून गेले.

त्या ठिकाणी संशयीत काळू चव्हाण याने या 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करीत घडलेल्या घटनेची माहिती कुणालाही दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक हर्षाराणी देवरे करीत आहे.

LEAVE A REPLY

*