अकरावीच्या दुसर्‍या फेरीसाठी 6 हजार निश्चित; 24 जुलैपर्यंत प्रवेश

0
नाशिक । अकरावी प्रवेशासाठीची दुसरी यादी गुरुवारी दुपारीच जाहीर करण्यात आली. यादीतील विद्यार्थ्यांना 24 जुलै संध्याकाळपर्यंत आपली प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दुसर्‍या प्रवेश यादीत कला, विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसी या चारही शाखांसाठी 6 हजार 737 प्रवेश निश्चित करण्यात आले.

द्वितीय प्रवेश विज्ञान शाखेसाठी 3 हजार 34, वाणिज्य शाखेसाठी 2 हजार 342, कलाशाखेसाठी 1 हजार 134 व किमान कौशल्य अर्थात एमसीव्हीसीसाठी 227 असे एकूण 6 हजार 737 प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना 21, 22 व 24 जुलै रोजी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

याशिवाय प्रवेश घेतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्र झेरॉक्ससह तसेच 2 पासपोर्ट फोटोग्राफ ठेवणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे त्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

अशा विद्यार्थ्यांना तिसर्‍या यादीसाठी कोणतेही बदल करता येणार नाही. त्यांची नावे पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केली जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्जाचा भाग एक दोन भरलेला नाही त्यांनी 26 जुलै रोजी बीवायके, पंचवटी व बिटको महाविद्यालय, नाशिक रोड येथे तो भरावा.

तिसर्‍या गुणवत्ता यादीसाठीच्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम व शाखा पसंतीक्रम 26 जुलै रोजी बदलता येणार आहे. दरम्यान तिसरी गुणवत्ता यादी 29 जुलै 2017 रोजी संबंधित संकेतस्थळावर बदलता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठीची पहिली यादी 10 लागल्यानंतर प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. 14 जुलैअखेरपर्यंत सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. काही विद्यार्थ्यांनी यादीत आपला क्रमांक येऊनही अपेक्षित महाविद्यालय न मिळाल्याने प्रवेश घेतला नाही. आता दुसरी यादी गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाली.

या यादीतील विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत भाग नव्हता अशा विद्यार्थ्यांना 18 जुलै संध्याकाळपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नवीन 359 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत.

LEAVE A REPLY

*