Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुणेकरांनी अनुभवली पावसाची काळरात्र; ११ बळी, मदतकार्य सुरु

Share

पुणे | प्रतिनिधी

पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने अनेक घरांत पाणी शिरले. अनेकांचे संसार उध्वस्थ झाले. अचानक आलेल्या पावसाने रस्ते तसेच्या वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. पावसामुळे कुठे भिंत कोसळली तर कोणी वाहून गेले अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये पुण्यात पावसाने ११ बळी घेतले आहेत.

पावसाच्या हाहाकाराने घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढली. आतापर्यंत रौद्ररूप धारण करत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली.

रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ११ वर पोहोचला. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली. याबाबत रात्री बाराच्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली दरम्यान, जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले.

या भागातून ५०० नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आले आहे. दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे.

पुणे-सातारा मार्गावर वेळू गाव परिसरात एक ओम्नी कार वाहून गेली. असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!