वीज कर्मचार्‍यांच्या पेन्शनसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

0

शिर्डीत राज्यव्यापी मेळाव्यात ना. विखेंची ग्वाही

शिर्डी (प्रतिनिधी)- एक लाख वीज कर्मचारी व सेवानिवृत्त वीज कर्मचार्‍यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात दिले.
शिर्डी येथील साई पालखी निवारा येथील सभागृहात संपन्न झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महापारेषण कंपनीचे संचालक ओमप्रकाश एम्पॉल, अहमदनगर महावितरण मंडलाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, संघटनेचे उपाध्यक्ष रावसाहेब मोरे यांच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एन.के. मगर, महावितरणचे कार्यकारी संचालक सचिन ढोले, महापारेषण कंपनीचे कार्यकारी संचालक सुरज वाघमारे, महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे, महापारेषण मुख्य औद्योगिक अधिकारी अनंत पाटील, संघटनेचे महापारेषण अध्यक्ष बाबा वाकडे, महानिर्मितीचे अध्यक्ष डी.एन. देवकाते, उपसरचिटणीस आर.पी. थोरात, प्रकाश निकम,अशोक पांथरकर, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, मध्यवर्ती कार्यालय सचिव श्रावण कोळणूरकर, महापारेषण नाशिकचे मंडल जाधवउपस्थित होते.
प्रास्ताविक करताना सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन म्हणाले, सध्या राज्यातील कंत्राटी वीज कामगार संपावर असून यावर योग्य तो तोडगा निघावा, वीज कर्मचार्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, वाहिनी कर्मचार्‍यांना आठ तास काम देण्यात यावे, वेतनातील तफावत दूर करावी, बदली धोरणात बदल करावा आदी मागण्या केल्या.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संघटनेच्या मागण्या रास्त असून गेल्या बारा वर्षापासून संघटनेचा पाठपुरावा सुरु असून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तिन्हीही कार्यकारी संचालक यांनी दखल घ्यावी. यासाठी मी सुध्दा या मागण्यांकडे राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांचे लक्ष वेधणार असून संघटनेबरोबर बैठकीचे आयोजन व्हावे यासाठी प्रयत्न करील. महापारेषण संचालक एम्पॉल यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद झालेले असून अधिक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांनीही कार्य चांगलेच केले. संघटनेचे उपाध्यक्ष रावसाहेब मोरे यांनी गेल्या 30 वर्षापासून चांगली सेवा केली, त्यामुळे संघटनेने केलेला कार्यगौरव सोहळा स्तूत आहे असेही आवर्जुन सांगितले. महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन ढोले,कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे, कार्यकारी संचालक सुरज वाघमारे ए.के. मगर यांनी ओमप्रकाश एम्पॉल, दत्तात्रय कोळी यांनी मार्गदर्शन केले.

स्वातगाध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी आभार मानले तर अशोक पाथरकर, अनिल शिरसाठ यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमास राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल शिरसाठ, सुनिल दळे, भारत कोल्हे, दत्तात्रय थोरात, विजय पाटील, आत्माराम देशमुख, संतोष नेवासकर, भास्कर तरटे, सतिश भुजबळ आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*