Type to search

Featured सार्वमत

विजेच्या धक्क्याने शिक्षक पत्नीचा मृत्यू

Share

मुलाचाही करूण अंत । अकोले तालुक्यातील घटना

अकोले (प्रतिनिधी)- विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गर्दनी शिवारात काल सायंकाळी घडली. संगीता दिलीप झोळेकर (वय-40) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय-16) दोघे मूळ रा. गर्दनी, हल्ली- अमृतनगर, नवीन नवलेवाडी, अकोले असे यातील मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे अकोले शहरासह गर्दनी गावावर शोककळा पसरली आहे.

अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप झोळेकर यांची गर्दनी शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांच्या पत्नी संगीता व मुलगा अविष्कार हे काल शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यासाठी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मोटार सुरू करण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते.अविष्कार याने यावर्षी अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते पब्लिक स्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाला होता. योगा क्रीडा प्रकारात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले होते. मुलगा व पत्नी फोन उचलत नाही म्हणून दिलीप झोळेकर यांनी आपल्या नातेवाईकांस फोन करून त्यांना शेतात जावयास सांगितले असता गर्दनी शिवारातील कतार पाइन येथे शेतात सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्यांचे दोघांचेही मृतदेह आढळले. त्यानंतर त्यांचे मृतदेह रात्री उशिरा अकोले येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले. आज गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!