थकित वीजबिल भरण्यास मुदतवाढ

0
15 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकर्‍यांचे वीज बिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय काल बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.30 ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती.
या घोषणेनुसार शेतकर्‍यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
चालू वीजबिल 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांना आता भरता येईल.15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकर्‍याचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकर्‍यांनी भरायचे आहे.
ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकर्‍यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकर्‍यांनी घेतला तर शेतकर्‍यांचे दंड व्याज माफ होणार आहे.

 उर्जामंत्र्यांचा इशारा उर्जामंत्र्यांचा इशारा शेतकर्‍यांच्या सूचनानंतर आता 15 नोव्हेंबरपर्यंत बिल भरण्याची मुभा सरकारने दिली आहे. जर थकित वीज बील या कालावधीत शेतकर्‍यांनी भरले नाही तर त्यांची वीज खंडित केली जाईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील थकबाकीदारांना तात्पुरता दिलासा
कृषिपंप वीज ग्राहकांकडील वाढत्या थकबाकीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत किमान चालू वीजबिल न भरणार्‍या कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 57 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 2 हजार 285 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 50 हजार शेतकर्‍यांची वीज खंडित करण्यात आली. अन्य थकबाकीदारांचीही वीज खंडित केली जाणार होती. पण आता थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

 

 

LEAVE A REPLY

*