Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रीक बस

सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रीक बस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पर्यावरणाच्या (environment) संवर्धनासाठी राज्य शासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीच्या (CNG) वाहनांचा आधार घेण्यात आला होता. आता सीएनजी पाठोपाठ येत्या सहा महिन्यानंतर 25 इलेक्ट्रिक बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

- Advertisement -

शहर बस वाहतुकीसाठी शासनाने नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) विजेवर चालणार्‍या 50 बसेस घेण्याचे निर्देश दिले होते या पार्श्वभूमीवर येत्या सहा महिन्यात 50 बसेस पैकी 25 बसेस मनपाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

इन कॅप निधीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून 50 इलेक्ट्रीकल बसेस (Electric buses) खरेदी करण्यासाठी 40 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार होते त्यापैकी 25 बसेस खरेदी करण्यासाठी लागणारे 20 कोटी रुपये निधी खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या बसेस खरेदी करण्याच्या दृष्टीने टेंडर प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं; पंतप्रधानांचा कार्यकर्त्यांशी संवाद

या बसेस खरेदी टेंडर दाखल करणारे एजन्सीने खरेदी करावयाचे आहेत, महापालिका त्यांना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन साठी जागा उपलब्ध करून देणार आहे त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारून त्याचा खर्चही त्यांनाच करावा लागणार आहे.

लवकरच निर्णय होऊन बसेस खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठीच्या एका बसला लागणाऱ्या दिड कोटी रुपयांच्या खर्चात 50 लाख रुपये शासनाच्या निधीतून दिले जाणार आहेत. तर उर्वरित एक कोटी रुपये संबंधित संस्थेने टाकायचे आहेत.

या बसेस साठी लागणाऱ्या चार्जींग स्टेशनची जागा मनपा उपलब्ध करुन देणार असून, ते स्टेशनही या संस्थेनेच चालवायचे आहे. या सर्व सुविधांच्या बदल्यात मनपाला द्यावयाच्या निधीबद्दल टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतरच या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.

राज्यातील ‘या’ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घोषित; मे महिन्यात मतदान

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

येत्या सहा महिन्यात नाशिकच्या सिटी लिंक बसेसच्या ताफ्यामध्ये 25 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील अशी माहिती सिटीलिंक विभागाचे उपायुक्त शिवाजी चव्हाणके यांनी दिली. प्रत्येक इलेक्ट्रीकल बस ही बारा मीटरची राहणार असून, त्या बसमध्ये एकूण 50 प्रवाशी क्षमता राहणार आहेत.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या