चांदेकसारे जि.प. गट निवडणुक ; अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- चांदेकसारे जिल्हा परिषद गटासाठी 20 तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणुक शाखेकडून देण्यात आली.
जिल्ह्यात झेडपीचे एकूण 73 गट आहेत. फेबु्रवारी महिन्यांत झालेल्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे जि.प. गटात आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेला. यामुळे या गटाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 जुलै ते शनिवार 5 ऑगस्टपर्यत आहे. 7 ऑगस्ट रोजी प्राप्त अर्जाची छाननी होणार आहे. त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

*