273 ग्रामपंचायतींची निवडणूक : प्रारूप मतदार यादी 8 ऑगस्टला होणार प्रसिध्द

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील होणार्‍या 273 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमानंतर आता अंतिम प्रारुप यादीसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 8 ऑगस्टला प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणुक शाखेच्यावतीने देण्यात आली.

ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान, जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यानूसार प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. दरम्यान, 189 हरकती प्र्राप्त झाल्या असून 31 जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

आता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 8 ऑगस्टला ही मतदार यादी प्रसिध्द होईल. त्यावर 8 ते 14 ऑगस्ट हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. हरकती व सूचना लक्षात घेवून 19 ऑगस्टला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करुन अंतिम यादी 21 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय संख्या – 
अकोले-13, संगमनेर-41, कपोपरगाव-32, श्रीरामपूर-16, राहाता-20, राहुरी-17, नेवासा-20, नगर-34, पारनेर-17, पाथर्डी-11, शेवगाव-22, कर्जत-9, जामखेड-3, श्रीगोंदा-18 आदी 273 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.
………….

LEAVE A REPLY

*