272 ग्रामपंचायत निवडणूक : प्रभाग रचना तयार!

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यापासून 20 जूनपर्यत तालुकास्तरावर प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत शाखा यांनी दिली.
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 272 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर 15 दिवसापूर्वी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला.
संबंधित तहसीलदारांनी गुगल मॅपव्दारे गावनिहाय नकाशे तयार केले. तलाठी व ग्रामसेवकांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून सीमा निश्‍चित केली. अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती यांचे आरक्षण निश्‍चित केले. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांनी स्वाक्षर्‍या करून प्रारुप प्रभाग रचनेला तत्वतः मान्यता दिली.
आता संबंधित गावात ग्रामसभा घेऊन तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत 27 जूनअखेर काढण्यात येणार आहे. 10 जूनपासून प्रभाग रचना व आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरवात होऊन ती 3 ऑगस्टपर्यत चालू राहणार असून जिल्हाधिकारी प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देणार आहेत.

LEAVE A REPLY

*