Type to search

Featured सार्वमत

381 निवडणूक कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा

Share

नगर लोकसभा : प्रशिक्षणाला दांडी भोवणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या कामात हलर्गीपणा करणे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणे 381 शासकीय कर्मचार्‍यांना भोवणार आहे. निवडणूक विभागाने या सर्व कर्मचार्‍यांना नोटीस धाडत गुन्हे दाखल का करण्यात येऊ नयेत, अशी नोटीस बजावली आहे. नगर लोकसभा निवडणुकीचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही नोटीस काढली असून लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नगर लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे. तर शिर्डीसाठी 29 ला मतदान आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी 21 हजार अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नगर लोकसभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 10 हजार 582 कर्मचार्‍यांना गेल्या रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात राहुरीत 1 हजार 502, शेवगावात 1 हजार 908, नगरमध्ये 1 हजार 945, श्रीगोंद्यात 1 हजार 640, कर्जत-जामखेडमध्ये 1 हजार 873 कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. यातील 381 कर्मचार्‍यांना दांडी मारली. याची गंभीर दखल जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतली असून प्रत्येक सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांकडून त्यांनी अहवाल मागविला असून सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांना संबंधितांना नोटीस बजावण्याचे अधिकारी दिले आहेत. प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांना दिलेल्या नोटीसमध्ये गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आता दुसर्‍या टप्प्यातील कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण येत्या शनिवारी असून यावेळी 8 हजार 944 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!