Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निवडणूक कामामुळे शिक्षकांच्या सुट्ट्यांच्या कालावधीचा घोळ

Share
आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार, Latest News Transfer Route Open Online Aplication Sangmner

दिवाळीची सुट्टी 22 तारखेपासून ||  17 दिवस सुट्ट्यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना 17 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या जातात. यंदा देखील 19 तारखेपासून 11 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, 21 तारखेला मतदान असल्याने शिक्षकांना सुट्ट्यांतील दोन दिवस निवडणुकीचे काम करावे लागणार आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या 22 तारखेपासून पुढे 17 दिवस देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन केले आहे.

यात वर्षभरातील 365 दिवसांपैकी 237 दिवस शैक्षणिक कामकाजाचे दिवस असून उर्वरीत 129 दिवस शिक्षकांना सुट्ट्या राहणार आहेत. यात 17 दिवस दिवाळी 32 दिवस उन्हाळी, 2 दिवस जिल्हाधिकारी घोषित, स्थानिक सुट्टी 1, शासकीय सुट्ट्या 20, राष्ट्रीय सण 5 आणि रविवार 51 दिवस अशा सुट्ट्या आहेत.

यंदा दिवाळीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. 21 तारखेला मतदान होणार आहे. शिक्षकांच्या दिवाळीची सुट्टी 19 तारखेपासून सुरू होत आहे. यामुळे सुट्टीतील सुरूवातीचे दोन दिवस त्यांना निवडणुकीचे कामे करावी लागणार आहेत. यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्या निवडणुकीनंतर 22 पासून पुढे 17 दिवस देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदेत हा बदल करण्यात आलेला आहे. नगर जिल्हा परिषदेने अद्याप सुट्ट्यांच्या नियोजनात बदल केलेला नाही. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शिक्षण विभाग देखील याबाबत स्पष्ट बोलत नाही.

निवडणुकीच्या कामामुळे प्राथमिक शिक्षकांच्या सुट्ट्याच्या नियोजनात बदल करण्यात येणे आवश्यक आहे. याबाबत शिक्षणाधिकार्‍यांना पत्र देण्यात आलेले आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणे नगर जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी.
– सुनील शिंदे, सरचिटणीस, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, नगर.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!