Thursday, April 25, 2024
Homeनाशिकओबीसी ऐवजी खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु

ओबीसी ऐवजी खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधानसभेत सत्ताधार्यांसह विरोधकांनी मिळून एकमुखी ओबीसी आरक्षणाशिवाय OBC Reservation निवडणुका घेणार नसल्याचा ठराव केला असला, तरीही जिल्ह्यात ओबीसी आरक्षित जागा या खुल्या गटातून Open Cateogory निवडणूक Elections घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारल्याने नगर पंचायतींच्या निवडणुकीत प्रक्रिया न केलेल्या जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांच्या 11 जागांचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला होता. त्याची निवडणूक अधिसूचना प्रशासनाने जाहीर केली असून, त्यासाठी उमेदवारी अर्जही स्वीकारले जाणार आहेत.

जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या 6 नगरपंचायतींसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 98 जागांसाठी ही निवडणूक होणार होती; परंतु सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणे प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित 11 जागांबाबत कुठला निर्णय घ्यावयाचा म्हणून निवडणूक आयोगाने या जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवली होती. त्यानंतर न्यायालयाने आरक्षण रद्द केले. परिणामी या जागांची नव्याने निवडणूक घेण्यासाठी आयोगाने कार्यक्रम जाहीर केला.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निफाड, देवळा, दिंडोरी आणि कळवण या चार नगरपंचायतीतील ओबीसींच्या 11 जागांची सर्वसाधारण गटातून अर्थात आरक्षण रहित निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येतील.

4 जानेवारीला छाननी होईल, तर 10 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असेल. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटपासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर प्रचाराला सुरुवात केली जाईल. 18 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. दि. 19 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. दरम्यान, मतमोजणी 21 डिसेंबरला मतदान झालेल्या नगरपरिषदांतील सर्वच जांगासोबतच या 11 जागांचाही निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या