Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: निवडणूक काळात 10000 उचापात्याखोरांवर चॅप्टर

Share

जिल्हा पोलीस करणार कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून समाजकंटकाविरुध्द प्रतिबंधक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तब्बल 10 हजार जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून निवडणूक काळासाठी अडीच हजार जणांना तात्पुरते तडीपार करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद न होता शांततेत निवडणूक पार पडली. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, प्रभारी अधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याकडून गुन्हेगारांची कुंडली तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सुमारे 10 हजार जणांकडून विधानसभा निवडणूक काळात चांगल्या वर्तणुकीचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सुमारे आडीच हजार समाजकंटकांना निवडणूक काळासाठी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून तडीपार केले जणार आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान ज्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली होती. त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जणार आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रतिबंधक कारवाईने वेग घेतला आहे. जिल्हा विशेष शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा दररोज आढावा घेतला जाणार आहे.

सराईतांची यादी तयार..
विधानसभा निवडणुकीदरम्यान सराईत गुन्हेगार असलेल्या 20 ते 25 जणांची यादी पोलिस प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. त्यांच्या तडीपारचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे पाठविले जाणार अहे. त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात यावे, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडून केली जणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!