निवडणुक निरीक्षक राजेशकुमार यांचा पाहणी दौरा

0

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक  राजेश कुमार यांनी नाशिक (पूर्व) तसेच देवळाली विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्रे सुरक्षितता कक्षाची पाहणी केली. तेथील सुरक्षितता कक्षाची सिलबंदी, सिसीटीव्ही यंत्रणा, वाहतुक व्यवस्थेची पाहणी करून निरीक्षण व मार्गदर्शन केले.

या दोन्ही मतदार संघातील दाट लोकवस्तीतील तसेच संवेदनशील अशा अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदारांसाठीच्या सोयी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांची पाहणी केली.

याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, स्वाती थाविल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*