ग्रामपंचायत निवडणूक खर्च सादर करावा लागणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुका लढवलेल्या विजयी आणि पराभूत उमेदवारांसह बिनविरोध झालेल्या सरपंच, सदस्यांना 8 नोव्हेंबर अखेर निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
हा खर्च सादर न केल्यास संबंधित उमदेवारांना 5 वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या निवडणूक खर्च सादर करावयाच्या अंतिम तारखेवरून गोंधळाची स्थिती होती. काहींनी 7 तर काहींनी 9 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याच्या सूचना असल्याचे सांगितले होते.
मात्र, हा खर्च सादर करण्यासाठी 8 तारीख अंतिम असल्याचे मरकड यांनी सांगितले. गेल्या महिन्यात 205 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत जिल्ह्यात 3 हजार 550 उमदेवारांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी तर 637 उमेदवारांनी थेट सरपंच पदासाठी निवडणुका लढवल्या होत्या.
यासह 349 सदस्य बिनविरोध तर 10 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले होते. असे 4 हजार 546 जणांनी निवडणुका लढल्या होत्या. या सर्वांना आपला निवडणूक खर्च 8 नोव्हेंबरपूर्वी सादर करावा लागणार आहे. निवडणूक खर्च सादर न करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मरकड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*