निवडणूक खर्च प्रकरणी 88 उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याप्रकरणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या एकूण 88 उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
गेल्या चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडली. दरम्यान निवडणुकीत झालेला एकूण खर्च निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्यात सादर करणे अपेक्षित असताना पराभूत उमेदवारांनी याकडे कानाडोळा केला. निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले.
16 मे रोजी जिल्हा परिषद उमेदवारांसाठी सुनावणी ठेवण्यात आली.दरम्यान एकूण 32 पैकी केवळ 6 जणांनी हजेरी लावली होती. अनुपस्थित राहणार्‍यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानुसार बुधवारी 24 रोजी सुनावणीसाठी बैठक बोलावण्यात आली. 32 पैकी 12 हजर होते. तर 18 मे रोजी पंचायत समिती उमेदवारांसाठी सुनावणी पार पडली. यावेळी 58 पैकी 25 जणांनी दांडी मारणेच पसंत केले होते.
निवडणूक खर्च वेळेत सादर न करणार्‍या सर्वांना आपले म्हणणे सादर करण्याची अखेरची संधी देण्यात आली होती. पंचायत समितीचे 58 व जिल्हा परिषदेचे 32 असे एकूण 91 उमेदवार होते. पैकी तीन पराभूत उमेदवारांना आपले म्हणणे मांडण्यात यश आल्याने त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिली.
जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या उपस्थित पार पडलेल्या सुनावणी दरम्यान महसूलच्या उपजिल्हाधिकारी साधना सावरकर, सामान्य प्रशासनचे तहसीलदार गणेश मरकड, लिपिक सौ. कदम व कांबळे आदी उपस्थित होते.

  इतर 88 जणांवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिनियम 1961 चे कलम 15 अ अन्वये पुढील पाच वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. 16 व 18 मे पाठोपाठ मुदतवाढ देण्यात आल्याने 24 मे रोजी अखेरची सुनावणी पार पडल्याने संबंधितांची नावे राजपत्रात पाठविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*