Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये आज प्रचारतोफा थंडावणार

Share

कोलकाता | वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाने विशेष अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आज रात्री 10 नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणूक कालावधीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे. त्यामुळे आज रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसेच हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!