Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

निवडणूक आयोगाची एक्झिट पोलवर बंदी

Share

नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय जाहीर केला आहे. 21 ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह 17 राज्यांमधील 51 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यांसदर्भात ट्विट निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!