अकोले तालुक्यात 76.49 टक्के मतदान

0
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील 10 गावांच्या सरपंचपदासाठी काल सरासरी 76.49 टक्के इतके मतदान झाले. कुुठला ही अनुुुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.
10 ग्रामपंचायतसाठी 11 हजार 457 स्त्री व पुरुषांपैकी आठ हजार 764 म्हणजेच 76.49 टक्के इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान राजकीयदृष्ट्या जागृत अशा लहीत खुर्द येथे 86.15 टक्के, त्या खालोखाल डोंगरगाव येथे 84.76 टक्के, चास येथे 83.03 टक्के तर सर्वात कमी मतदान भंडारदरा येथे 60.86 टक्के झाले.
तालुक्यातील डोंगरगाव, चास,लहीत खुर्द व आंभोळ या बिगर आदिवासी तर शेंडी, भंडारदरा, वाकी, मुरशेत या राजकीयदृष्टया जागृत ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश होता.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील मुळा भागातील शिळवंडीचे सरपंच व सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती.
दहा ग्रामपंचायतीसाठी काल सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाली.सकाळी मतदारांनी उत्साहात मतदान केंद्रांवर येत मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. दुपारी मतदान असलेल्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे दुपारी मतदानाचे प्रमाण कमी दिसले परंतु सायं.मतदान संपण्याच्या तास दीड तास पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अनेक ठिकाणी ज्येस्ट नागरिकांना कार्यकर्ते उचलून मतदान केंद्रावर आणत होते.पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच पदासाठी निवडणूका होत असल्याने निवडणूक झालेल्या गावच्या पक्षांतर्गत तर काही ठिकाणी सेना भाजप व राष्ट्रवादी-काँग्रेस असा सामना पहावयास मिळाला.मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
काल झालेल्या ग्रामपंचायतसाठी सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.या निवडणुक निकालाकडे तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष्य लागले आहे.

  अकोले तालुक्यात काल झालेल्या  दहा ग्रामपंचायती व  त्याठिकाणी झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- डोंगरगांव – 84.76, चास  –  83.3, लहित खुर्द – 86.15, आंभोळ –  72.70, भंडारदरा –  60.86, गुहिरे – 60.98, वाकी – 62.78, शेंडी – 78.72, मुरशेत – 74.14, सोमलवी – 75.32  अकोले तालुक्यात काल झालेल्या  दहा ग्रामपंचायती व  त्याठिकाणी झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- डोंगरगांव – 84.76, चास  –  83.3, लहित खुर्द – 86.15, आंभोळ –  72.70, भंडारदरा –  60.86, गुहिरे – 60.98, वाकी – 62.78, शेंडी – 78.72, मुरशेत – 74.14, सोमलवी – 75.32

 

LEAVE A REPLY

*