Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पोटनिवडणूक : ज्याने त्याने गड राखला

Share

नगर जिल्ह्यातील निकाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकणार्‍या नगरकरांनी मात्र विविध पोटनिवडणुकांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या प्रस्थापितांना निवडून दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी विरूध्द युती असा सामना रंगण्याचे चिन्हे दिसत आहेत. संगमनेरातील प्रभाग 10 शिवसेनेचा बालेकिल्ला. पण तेथे आ. बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक राजेंद्र वाकचौरे यांनी बाजी मारली. सोनई गडाखांचा अभेद्य किल्ला. तेथे अपेक्षेप्रमाणे ‘क्रांतीकारी’ ची सरशी झाली. सोनई गणात कारभारी डफळ विजयी झाले. कोळपेवाडीतील पाच सदस्यांच्या निवडीत ग्रामस्थांनी पुन्हा काळे गटाच्या सदस्यांवरच विश्‍वास दाखविला. अकोलेतील आंबड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपला गड राखला. श्रीरामपूरात आदिक गटाने बाजी मारली. राष्ट्रवादीच्याच तरन्नूम शेख विजयी झाल्या. ही जागापूर्वी राष्ट्रवादीकडेच होती.

राहाता तालुक्यातील पिंपळस ग्रामपंचायत निवडणुकीत विखेंच्याच दोन गटात लढत झाली. यात नितीनराव कापसे गटाने बाजी मारली. कर्जत पंचायत समितीच्या कोरेगाव गणाच्या पोटनिवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव विजयी झाल्या. जामखेड नगरपरिषदच्या उपनगराध्यक्ष फरिदा आसिफ खान यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी दि 23 रोजी पोटनिवडणुक झाली यामध्ये भाजपाच्या जकिया आयुब शेख या विजयी झाल्या असून शहरावर भाजपाची पकड घट्ट होत असल्याचे दिसून येते आहे.

नगरमध्ये प्रस्थापितांना दणका
नगर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे. पारगाव भातोडी, पारेवाडी, मजले चिचोंडी या गावांमध्ये विद्यमान सरपंचांच्या हातातून सत्ता निसटली आहे. पारगाव येथील आ.शिवाजीराव कर्डिले गटाचा दारूण पराभव झाला. तर पारेवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या गटाने बाजी मारली. यासह मजले चिचोंली येथे विद्यामान सरपंचाच्या पत्नीला पराभव पत्कारावा लागला, तर इसळक, भोयरे पठार, भोयरे खुर्द येथेही सत्तापरिवर्तन झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!