चांदेकासारे गटासाठी 20 ऑगस्टला मतदान

0

आरक्षण सर्वोच्चकडून कायम

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे जिल्हा परिषद गटाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकसंख्येनुसार जिल्हा प्रशासनाने हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवला होता.

मात्र, या आरक्षणावर गटातील काही लोकांनी हरकत घेत हा गट ओबीसी व्यक्तीसाठी राखीव करण्याची मागणी केली. यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. मात्र, न्यायालयाने जिल्हा प्रशासनाने काढलेले आरक्षण कायम ठेवले आहे.

आता या गटासाठी 20 ऑगस्टला मतदान होणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी चांदेकासारे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. यात 31 जुलैपासून निवडणुकीच्या तारखेची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रसिध्द करणे, याच दिवसापासून 5 ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरणे,

7 ऑगस्टला नामनिर्देशनपत्राची छानणी आणि त्यावर निर्णय, याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे, 10 ऑगस्टला नामनिदर्शेन अंतिम करणे अथवा नामंजूर करणे, यासह जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अपील करण्यास शेवटची तारखी, 14 ऑगस्टला जिल्हा न्यायाधीश यांच्या अपिलावर सुनावणी आणि निकाल देण्याची संभाव्य तारीख,

याच दिवशी उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत, ज्या ठिकाणी अपील करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी 16 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

14 तारखेला मतदारकेंद्राची यादी तयार प्रसिध्द करण्यात येणार असून 20 ऑगस्टला प्रत्यक्षात मतदान होणार आहे. त्यानंतर 21 तारखेला मतमोजणी होऊन 24 तारखेला निवडून आलेल्या सदस्यांची नाव प्रसिध्द करण्यात येणार आहे.

हा गट प्रशासनाने ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवला होता. मात्र, या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी हा गट ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी आधी विभागीय महसूल आयुक्त, त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र, न्यायालयाने आरक्षणात बदल केलेला नाही.

या गावात आचारसंहिता –
चांदेकासारे, शहापूर, घारी, डाऊच खु, मढी खु, देर्डे चांदवड, देर्डे कोर्‍हाळे, जेऊर कुंभारी, सोनेवाडी, वेस, पोहेगाव बु, मनेगाव, राजणगाव देशमुख, धांडेवाडी, अंजनापुर, जवळके, बहादरपुर, बहादराबाद, काकडी, सोयेगाव, पोहेगाव खु, मल्हारवाडी यांचा समावेश आहे.

 

 

LEAVE A REPLY

*